Loading...

Example Scripts

Video flow / साधारण मचकूर कळण्यासाठी खाली उदाहरणं आहेत. Video मजेशीर होण्यास mimicry, local style मध्ये बोलणे, mix भाषा, टपोरी style वेग वेगळे हावभाव / हातवारे इत्यादी सर्व चालेल, actually केलेलं अधिक चांगलं होईल.

उदा. 1 …  मी प्रथमेश… काल ना शाळेत येताना एक काका “पाचापच” थुंकताना दिसले. त्यांना हाक टाकली “ओ काका” काका बहुदा विचार करत होते मी कोण आहे. पटकन म्हणालो, “अहो पिचकारी मारत आपला परिसर किती घाण केलात” असे म्हणल्यावर काका थक्कच झाले. माझ्याकडे बघतच राहिले. मी महाराष्ट्राचा स्वच्छता मॉनिटर आहे. कोल्हापुरात कोणी घाण केली तर जागीच रोखणार. Lets Change

उदा. 2 …  माझं नाव दीप्ती … काल आई सोबत बाजार गेली होती, तर भाजीवाल्याने चहा पियुन कप बाजूला टाकला. मी म्हणाली “हे छान केलत काका. इथेच कप टाकून तुमच्या भाजी जवळ माश्यांना चहा चे आमंत्रण दिले. बघा की किती माश्या मस्त चहा enjoy करत आहेत.”मी महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर आहे. चूक झाली तर दुर्लक्ष्य नाही करणार. पालघर घाण होऊन देणार नाही. Lets Change

उदा. 3 … माझं नाव सुमीत … कमला बागेबाहेर नाही का… भेळवाला असतो. द्रोण टाकायला टोपली पण ठेवतो. काल संध्याकाळी बघितलो एका ताईने द्रोण टोपली कडे टाकला आणि निघाली, पण द्रोण रस्त्यावर पडला होता. मी ताई ला थांबवलं अन थोडी मदत करणार का विचारलो. ताई पुढे निघण्याच्या आत बोललो, माझी नाही, द्रोणाकडे बोट दाखवत … परिसराची … चाट पडली ना ताई. Sorry म्हणाली. मी महाराष्ट्राचा स्वच्छता मॉनिटर आहे. चूक झाली तर दुर्लक्ष्य नाही करणार. सोलापूर घाण होऊन देणार नाही. Lets Change

उदा. 4 …  मी अमोल … स्वच्छता मॉनिटर झाल्यापासून जाणवायला लागले की किती लोक वाटेल तिथे थुंकतात. म्हणून एक / दोन बाटल्या ठेवायला लागलो. signal वर आमची रिक्षा थांबली आणि काका खाली वाकले. चटकन म्हंटल .. काका ये लो. दिनभर इसी बाटली में थुको, रास्ता रंगवू नका. उतरल्यावर काकांने १० रुपये कमी घेतले. मी महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर. पुण्यात चूक जागीच रोखणार. Lets Change  

उदा. 5 … माझं नाव शीतल … काल मी बघितलं .. एक आजोबा… म्हणजे 60 / 70 years चे तर होतेच.. विमल ची पुडी तोंडात टाकली आणि अशी … टिचकी … मारून टाकली की रस्त्यावर. हाक टाकली “अहो काका” … आजोबांना काका म्हंटल म्हणून त्यांना आनंद झाला असेल .. पण मग म्हंटल टी टाकलेली रिकामी पुडी खूप सुंदर आहे, पण रस्त्यावर घाण दिसते. खिशात ठेवून नंतर कचरापेटी मध्ये टाकता का. आजू बाजूची लोक थक्क, आजोबा गप्प … मग Sorry म्हणाले. मी महाराष्ट्राची स्वच्छता मॉनिटर आहे. चूक झाली तर दुर्लक्ष्य नाही करणार. छ. संभाजीनगर घाण होऊन देणार नाही. Lets Change

उदा. 6 …  मी अभिनव … स्वच्छता मॉनिटर झाल्यापासून जाणवायला लागले की किती लोक वाटेल तिथे थुंकतात. म्हणून एक / दोन बाटल्या ठेवायला लागलो. आज सकाळी signal वर आमची रिक्षा थांबली आणि काका खाली वाकले. चटकन म्हंटल .. (हेरा फेरी सिनेमातील बाबुराव गणपतराव आपटे style मध्ये) “काका ये लो. दिनभर इसी बाटली में थुंकीनेका, रास्ता रंगावनेका नाही रे बाबा”. उतरल्यावर काकांने माझ्याकडून १० रुपये कमी घेतले. मी महाराष्ट्राचा स्वच्छता मॉनिटर. पुण्यात चूक जागीच रोखणार. Lets Change

उदा. 7 … (In Jackie Shroff style) कलको है ना आपुन ऐसेईच घूम रहेला था. एक आदमी का मुह भरा भरा दिखा .. मेरेको पता चला की पान घुटका कूच खा रहेला है… तो मैं देखता राहा.. देखा देखा… जैसे वोह इधर उधर देखनेको लगा मैं सोचा अब थुकेंगा … लेकिन मैं पेहलीच बोला… भिडू इधर नाय .. कोने मे जाके मुह खाली कर …. Thank you मैं पार्थ .. महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर. गोंदिया गंदा नाही होने दूंगा. Lets Change

 उदा. 8 …  नमस्कार मी नीता .. घरी जाताना चेंबूर स्टेशन मधून बाहेर पडले. एक काकूने chips पाकीट टाकलं कि रस्त्यावर. मी त्यांना म्हणाले … काकू drainage pipe block करण्याचे मस्त नियोजन केलत … आधी नुसत्याच लाजून हसल्या, पण माझ्याकडे बिघितले आणि sorry म्हणून टाकलेले पाकीट उचलून purse मध्ये ठेवले … मी महाराष्ट्राची स्वच्छता मॉनिटर. मुंबई मध्ये कचरा टाकून देणार नाही. Lets Change

उदा. 9 … आमच्या शेजारचे आजोबा त्यांच्या दारात बसून बिडी फुकत असतात. आणि तिथेच टाकतात. काल संध्याकाळी आमच्या घरातला कान तुटलेला मग घेऊन गेलो. त्यांना म्हणालो आजोबा मी आता महाराष्ट्राचा स्वच्छता मॉनिटर झालो आहे. हे घ्या तुम्हाला present … बिड्या झाल्या की यात टाकत जा, आणि नंतर घरातील कचऱ्यासोबत direct घंटागाडीत जाऊ द्या. आता शेजारच्या काकू सगळ्यांना सांगत सुटल्यात – पारश्याला चांगली शिकवणी मिळते … मी प्रशांत, महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर, जालना. Lets Change

 उदा. 10 … काल मिरज हुन येताना बघितलो पुढच्या सीट वरचे काका शेंगदाण्याचा कागद चुरगाळून सीटच्या खाली टाकले. चार लोकांना ऐकू जाईल असे शुक शुक करून त्यांना विचारलो काका तुम्हीच टाकलेला चुरगळा उचलून घेता का मी उचलून देऊ. नंतर कचरापेटीत टाका. त्यांने उचलून घेतला. सांगली पर्यंत पोचता पोचता एका काकूने monaco दिले आणि पहिल्यांदा उतरताना कंडक्टर हसून पुन्हा भेटू म्हणाले. … मी संतोष, महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर, सांगलीत घाण कराल तर जागीच थांबवीन. Lets Change 

 These are only examples to know main lines and flow for video. Swachhta Monitor should actually do Swachhta Monitorgiri regularly and tell those stories in example formats.

Watch PLC Swachhta Monitor Ambassador videos that also serve as Sample Videos for reference to make correct narration videos.