Loading...

कसे राबवावे

PLC स्वच्छता मॉनिटर २०२४-२५ – काय आणि कसे करायचे

१. दिवस पहिला – सर्व विद्यार्थ्यांना सांगा – “आज पासून तुम्ही महाराष्ट्राचे स्वच्छता मॉनिटर. कुठेही येत जात असताना कोणीही सार्वजनिक ठिकाणी घाण करताना, म्हणजे थुंकताना किंव्हा कचरा टाकताना दिसले तर जागीच त्या व्यक्तीला थांबवून काही समजवायचे नाही, पटवायचे नाही, कसले ही ज्ञान द्यायचे नाही. फक्त चूक pointout करायची, ज्याने चूक केली त्यांनाच त्यांची चूक दुरुस्त करण्याची विनंती करायची, सर्व प्रतिक्रिया लक्ष्यात ठेवायच्या आणि आपल्या वाटेला निघायचे

२. २० जानेवारी २०२५ पर्यंत रोज वर्गात उपस्थिती घेतल्यावर शिक्षक वर्गाला विचारतील “काल कोणी कोणी स्वच्छता मॉनिटरगिरी केली”. सुरवातीला थोडं प्रोत्साहन द्यायला लागू शकेल. २ / ३ विद्यार्थ्यांना त्यांच्या जागीच उभा राहून घटना खालील प्रमाणे सांगायला सांगायची.

३. निष्काळजी लोकांना खरोखर थांबवले त्यावेळी विद्यार्थ्यांने चूक अगदी नम्रपणे pointout करून दुरुस्त करण्याची विनंती केली असणार. परंतु वर्गात मित्रांना किस्सा सांगितल्या सारखे फुल्ल ड्रॅमेबाजी, थट्टा मस्करी करायला सांगून creative होण्यास पूर्ण मोकळीक द्यावी. हसत खेळत गंमतशीर पणे सांगायला त्यांना मजा येईल. वर्गात हास्य फुटेल आणि वातावरण प्रसन्न राहील. शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना देखील प्रत्येकाचा किस्सा ऐकायला मजा येईल. अभियानाचा भार आहे असे कोणालाही वाटणार नाही. किस्सा कसा सांगावा याची उदाहरणं (Example Scripts) वाचण्यासाठी Click करा. पुढे सोशल मीडिया वर विडिओ बघणार्यांना मजा येईल, शेअर केले जाईल. अधिक जोमाने स्वच्छता मॉनिटरगिरी होत राहील. निष्काळजीपणा थांबवत गेला जाईल, परिसरात स्वच्छता अधिक टिकेल. काही दिवसातच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, शब्द रचना, वाक्य रचना, बोलण्यात flow सुधारेल.

४. स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची घटना १० / १५ सेकंदांची असते. रंगवून सांगितल्याने किस्से अर्ध्य अर्ध्या मिनिटांचे होतील. दोन / तीन विद्यार्थ्यांचे किस्से ऐकल्यावर त्यातील किमान एक विद्यार्थ्या जवळ जाऊन त्याचा किस्सा फोन वर चित्रफीत करायचा. सगळं मिळून ३ / मिनिटे लागतील.

५. दिवसभरात कधीही कोणत्याही FB / Instagram ID वरून दिलेले text copy-paste करून, विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आणि post करायचे.

६. दररोज प्रति वर्ग किमान १ बरोबर post व्हावी. PLC स्वच्छता मॉनिटर साठी दिवसाला मिनिटाच्या वर लागत नाहीत

७. Post केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत post ची लिंक शेअर करावी. अधिक लोकांपर्यंत पोचेल.

८. ज्या पालकांना शक्य असेल त्यांच्या सोबत Text, Example Scripts शेअर करून त्यांना आपल्या पाल्याचे स्वच्छता मॉनिटरगिरी videos करून त्यांच्या सोशल मीडिया वर post करण्यास suggest करावे.