Loading...

मराठी मध्ये

PLC स्वच्छता मॉनिटर हे अभियान स्वच्छतेसाठी होईल, परंतु आता पर्यंत होते तसे स्वच्छता अभियान नसल्याचे लक्ष्यात घ्यावे. हे अभियान विद्यार्थ्यांना मूळभूत असामाजिक कृत्ये करणाऱ्याला थांबवून झालेली चूक जागीच सुधारण्यास विनंती करण्याची सवय करण्याचे आहे. त्या साठी शिक्षकांना वर्गात उपस्थिती घेतल्यावर रोज स्वच्छता मॉनिटरगिरी केल्याच्या घटनांचे विवरण विद्यार्थ्यांना सांगायला लावण्याची सवय करून घायची आहे.

किमान २०१४, स्वच्छ भारत अभियान सुरु झाल्यापासून, वर्षातून २ / वेळा स्वच्छता अभियान होत आहेत. स्वच्छता अभियानात जागृत असलेल्या लोकांना परत परत स्वच्छतेचे महत्व पटवणे, मुलांकडून परिसर स्वच्छता करून घेणे, स्वच्छता संधर्बात वक्तृत्व किंव्हा चित्रकला स्पर्धा इत्यादी होतात.

 परिसर अस्वच्छ दिसत असल्याने स्वच्छता अभियान करावे लागते, मग परिसर घाण दिसण्याच्या मूळ करणावरच उपाय केला पाहिजे. अधिकतर कचऱ्याबाबत निष्काळजीपणा नकळत होत असतो. कोणी जागीच चूक point-out करत नसल्याने अनेक वर्ष जनजागृती करून देखील ही असामाजिक सवय टिकून राहिली आहे. ही सवय मोडून काढण्यासाठी PLC स्वच्छता मॉनिटर अभियानात विद्यार्थी आणि शिक्षक यांने केवळ दोन-दोन सोपे कार्य करणे आहे.

१. शिक्षकांने सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे स्वच्छता मॉनिटर अशी भूमिका बजावण्याचे रोज “गृहपाठ” सांगायचं. विद्यार्थी कुठेही येत जात असताना, त्यांना कोणीही घाण करताना दिसताच, जागीच केवळ point-out करून नम्रपणे झालेली चूक सुधारण्याची विनंती करायची. चूक पटवून देणे, समजावणे इत्यादी मध्ये वेळ न घालवता “परिसर घाण दिसतो” इतकेच कारण सांगणे पुरेसे आहे. अनेक वर्ष जनजागृती करत असल्याने इतर दुष्परिणाम सर्वांना माहिती आहेतच. थांबवलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया लक्ष्यात ठेवायची.

२. रोज उपस्थिती घेतल्यावर “काल कोणी स्वच्छता मॉनिटरगिरी केली” इतके विचारून, दोन / तीन विद्यार्थ्यांना त्याच्या घटनेचे छोटेसे विवरण (गोष्टी सारखे) वर्गात शेअर करायला सांगायचे. दर रोज किमान एक घटनेचे चांगले विवरण विडिओ वर करून सोशल मीडिया वर पोस्ट करायचे. विडिओ सोबत  ‘text box’ मध्ये सुचवलेले ‘text’ असावे.

सोशल मीडिया वापर करण्याची कारणं:

  1. आपण अनेक वर्ष कचरा करणाऱ्याला थांबवण्याची शपथ घेतो, परंतु खरोखर कोणी कोणाला थांबवत नाही. आता खरोखर थांबवण्याची सवय विद्यार्थ्यांना होत आहे, आणि थांबवले जाईल ह्यावर लोकांना विश्वास होण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करायचा आहे.
  2. सोशल मीडिया वर पोस्ट करणे आणि इतरांच्या पोस्ट पाहणे लोकांच्या आवडीचे काम आहे. मुलांने समाज आणि देशउपयोगी काम केलेले कार्य सांगतानाच त्यांचे विडिओ शिक्षक किंव्हा शाळेने शेअर करून कौतुक केल्याचा पालकांना देखील अभिमान वाटेल. असे केल्याने विद्यार्थी प्रोसाहित राहतील आणि प्रत्येकाला आपला असा विडिओ पोस्ट करण्याची ओढ लागून, काही काळ हे आवडीचे काम होईल. निष्काळजी लोक ठिकठिकाणी थांबवली जातील, सवय कमी होत राहील.

नियमित केले की

१. शिक्षकांना स्वच्छता मॉनिटरगिरी बाबत रोज विचारण्याची सवय होईल आणि अभियानाचा कालावधी नंतर देखील स्वच्छता मॉनिटरगिरी होत राहील.

२. शिक्षकांने रोज विचारल्यामुळे विद्यार्थी लक्ष्यात ठेवतील आणि निष्काळजी लोक ठिकठिकाणी थांबवले जातील.

३. दोन / तीन वेळा थांबवले गेलेले लोक स्वतः जास्ती सतर्क राहतील, आणि कदाचित ते ही स्वच्छता मॉनिटरगिरी करतील.

४. निष्काळजीपणा जसा कमी होईल, परिसर स्वच्छ दिसू लागतील, कर्मचाऱ्यांवरील ओझं कमी होईल, प्रशासनाला काही मनुष्यबळ आणि वेळ सौदर्यीकरणाकडे केंद्रित करता येईल.

५. वर्गात / विडिओ वर गोष्ट स्वरूपात विवरण केल्याने मुलांच्या वैयक्तिक विकासात मदत होईल. Creativity वाढेल, वाक्य रचना सुधारेल, त्यांच्या बोलण्यात ‘flow’ आणि आत्मविश्वास वाढेल.

PLC स्वच्छता मॉनिटर अभियान २०२२ आणि २०२३ पहिल्या टप्प्यात वाढता प्रतिसाद आणि परिणाम पाहता २०२३ दुसऱ्या टप्प्याला  मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरच्या स्पर्धात्मक उपक्रमात शामिल करून सर्वाधिक १० गुणांचे महत्व दिले होते. परंतु गुणांकन करण्यात झालेल्या चुकांमुळे योग्य शाळांवर अन्याय सारखे झाले. रोहित आर्यांच्या प्रयत्नाने, आणि अनेक शाळांकडून लिखित मिळालेल्या समर्थनाने PLC स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ टप्पा २ मध्ये सर्वोत्तम १०१ शाळा नवडून घोषित करण्यात आल्या होत्या. Ok सांगितलेल्या प्रस्तावाप्रमाणे निवडलेल्या शाळांना २०२४-२५ मधील कार्यशाळा दरम्यान देण्याचे होते.  परंतु मंत्री महोदयांने अनेक वेळा सांगून देखील अधिकारी विलंब आणि टाळाटाळ करत आहेत.

२०२४-२५ मध्ये PLC स्वच्छता मॉनिटर २ टप्प्यात होणार. शासन निर्णयासाठी ४ महिने वाट पहिली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, विद्यार्थी गुणवत्ता विकास सारख्या उपक्रमांमध्ये स्वच्छता मॉनिटर शामिल केले गेले आहे. परंतु काय आहे याचे स्पष्टीकरण नाही. माझ्या संकल्पनेचे असून मला काहीच विचारले / सांगितले नसल्याने हे आपण राबवत असलेले नसावे, स्वच्छता मॉनिटर नावाचा शासन अनैतिक वापर करत असावे. माझ्यावर व माझ्या स्वच्छता मॉनिटर संकल्पनेवर अन्याय होत असल्याने मी २३ जुलै ते ३ ऑगस्ट उपोषण केले होते. माझ्या अपेक्षा चुकीच्या नसून चूक बरोबर करण्याचे मंत्री महोदयांने आश्वासन दिल्यामुळे उपोषण थांबवले, परंतु दि. ८ ऑगस्ट असून परत सुरु करावे लागले आहे.

PLC स्वच्छता मॉनिटर अभियान विद्यार्थ्यांना असामाजिक कृत्याकडे दुर्लक्ष्य न करण्याची सवय करून; कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढण्याचे अभियान आहे. यासाठी विना विलंब सातत्य जरुरी आहे. शासन अधिकारी विनाकारण विलंब आणि टाळाटाळ करत असल्याने निर्णय घेण्यापर्यंत Basic Activity साठी देखील माफक फी लावून अभियान सुरु करण्याचे ठरवले होते. आता हे कारण देत अधिक विलंब करण्याचे दिसू लागल्याने, शुक्रवारी (दि. ९ ऑगस्ट) रोजी तात्पुरते नोंदणी बंद केली होती. परंतु विलंब संपत नाही, त्यामुळे नोंदणी सुरु केली आहे. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासनाने अभियानास समर्थन दिले तर Basic Activity साठी नोंदणी केलेल्या शाळांना भरले शुल्क Reimburse करण्यात येईल.

आपल्या परिणामकारक PLC स्वच्छता मॉनिटर नोंदणी परत सुरु झाली आहे. नोंदणी करून मला आणि अभियानास समर्थन देण्यास प्रार्थना. अभियान १६ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर (पहिला टप्पा) आणि ११ ऑक्टोबर ते १८ जानेवारी (दुसरा टप्पा) असेल. दोन्ही टप्प्यात सर्वोत्तम शाळा विभागीय आणि राज्यस्तरावर निवडण्यात येतील.

आश्वासनाप्रमाणे शासनाकडून समर्थन / प्रायोजिकत्व साठी प्रयत्न असतील, न जमल्यास क्षमस्व असावे. अभियान स्पर्धेसाठी नाही, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकास व महाराष्ट्रासाठी करावे.

 

किमान पारितोषिके

१. विद्यार्थ्यांचे वैयक्तिक विकास.

२. महाराष्ट्रामधून कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणा वर नियंत्रण

३. Top Schools साठी Certificates

२०२४-२५ मध्ये अभियान अधिक काटेखोर आणि स्पर्धात्मक होणार आहे. सहभागाचा नोंदणी निशुल्क नसून खालील प्रमाणे माफक Registration Fee असणार आहे.

 

१. मूळभूत क्रियाकलाप (Basic Activity) – रु ४९९/- (शासनाने समर्थन दिले तर Reimburse होतील.)

२. दैनिक प्रशंसा (Daily Appreciation) – रु १४९९/-

३. संपूर्ण सहभाग (Complete Participation) – रु १९९९/-